रत्नागिरीसावर्डे:-सह्याद्री शिक्षण संस्थेचे संस्थापक, माजी खासदार,सहकार व शिक्षण महर्षी स्वर्गीय गोविंदरावजी निकम...

सावर्डे:-सह्याद्री शिक्षण संस्थेचे संस्थापक, माजी खासदार,सहकार व शिक्षण महर्षी स्वर्गीय गोविंदरावजी निकम यांच्या जयंती महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मेहुल कुलकर्णी याने तर निबंध स्पर्धेत श्लोक शिंदे व मुग्धा गोताड यांनी बाजी मारली.

सावर्डे:-सह्याद्री शिक्षण संस्थेचे संस्थापक, माजी खासदार,सहकार व शिक्षण महर्षी स्वर्गीय गोविंदरावजी निकम यांच्या जयंती महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मेहुल कुलकर्णी याने तर निबंध स्पर्धेत श्लोक शिंदे व मुग्धा गोताड यांनी बाजी मारली. सह्याद्री शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा सावर्डेतर्फे गत बारा वर्षे इयत्ता पहिली ते चौथीतील विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. कला व विज्ञान महाविद्यालय सावर्डेच्या सभागृहात या स्पर्धा नुकत्याच पार पाडल्या. सह्याद्री कॉम्पिटेटीव्ह अकॅडमीचे अध्यक्ष अनिरुद्ध निकम यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन पार पडले. यावेळी चिपळूण पंचायत समितीच्या माजी सभापती पूजा निकम, कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य तानाजी कांबळे,गोविंदराव निकम माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे,सावर्डेचे माजी सरपंच शौकत माखजनकर,मीरा जोशी,शकील मोडक व्यासपीठावर उपस्थित होते. जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी घरात हवेत आजी – आजोबा, सोशल मीडियाचे समाजावर होणारे परिणाम हे विषय ठेवण्यात आले होते.यात सह्याद्री शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा सावर्डेचा मेहुल मंगेश कुलकर्णी याने प्रथम क्रमांक मिळवला. रोख पाच हजार रुपये,चषक व प्रमाणपत्र असे बक्षीसाचे स्वरूप आहे. प्राथमिक शाळा खेर्डी- चिंचघरी -सतीचा दुर्वांक अविनाश शिंदे याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला.रोख रुपये तीन हजार,चषक व प्रमाणपत्र असे बक्षीसाचे स्वरूप आहे.तर आर.सी. काळे प्राथमिक विद्यालय पेढे परशुरामची साईशा कमलेश वांद्रे हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला.रोख रुपये दोन हजार,चषक व प्रमाणपत्र असे तृतीय क्रमांकाच्या बक्षीसाचे स्वरूप आहे.रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडचा प्रभास प्रमोद कदम व ज्ञानेश्वर विद्यामंदिर लांजाचा मैत्रेय अंकुर आजगावकर यांना उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त झाले. जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट निबंध लेखनाबद्दल श्लोक सूरज शिंदे यास आमदार शेखर निकम यांच्याकडून विशेष पारितोषिक घोषित करण्यात आले आहे. रोख रुपये पाच हजार, चषक व गौरवपत्र असे बक्षीसाचे स्वरूप आहे.या निबंध स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासे नं. २ ची मुग्धा रोहित गोताड ही प्रथम(रोख रु.५०००/-चषक व प्रमाणपत्र),जिल्हा परिषद शाळा नारदखेरकी नं .२ चा ईशान अभय गोखले हा द्वितीय (रोख रु. ३०००/-,चषक व प्रमाणपत्र), जिल्हा परिषद शाळा आंबव पोंक्षेची स्वरा मंगेश शिगवण ही तृतीय(रोख रू.२०००/-,चषक व प्रमाणपत्र), जिल्हा परिषद शाळा कोकरे नं. १ ची प्रांजल प्रकाश बुदर हिचा उत्तेजनार्थ(रोख रु.७५०/-,चषक व प्रमाणपत्र) क्रमांक आला आहे.
या स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून वसंत शंकर देसाई माध्यमिक विद्यालय असुर्डेचे भानुदास देसाई व गोविंदराव निकम माध्यमिक विद्यालयाच्या शिल्पा राजेशिर्के यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शकील मोडक, सेजल साळवी,रसिका सुर्वे,अनिल रेडेकर,सतीश वारे,अक्षता घाग,प्रणिता दिंडे,नीलम हुमणे,मनीषा शिंदे,शीतल सुर्वे,सायली शिर्के,स्मिता सावंत,संतोष शिर्के,समीक्षा पवार,प्रणित राजेशिर्के, पूनम भुवड,रूपाली बागवे,जान्हवी पवार,संजना चव्हाण,गायत्री वनकुते,योगिता मोहिते, पूनम चांदेकर ,रूपाली कुंभार, एकता जगदाळे, वैष्णवी बुदर, अंकिता गिरी यांनी प्रयत्न केले.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शनिवार दि. 17/01/2026 रोजी सकाळी 09:30 वाजता स्वर्गीय गोविंदरावजी निकम यांच्या स्मारकस्थळी होणार आहे.

Breaking News