रत्नागिरी'सिंदूर रक्तदान महायात्रा' ही भारतीय सैनिकांना रक्तदान करणारा देशातील पहिला उपक्रम-

‘सिंदूर रक्तदान महायात्रा’ ही भारतीय सैनिकांना रक्तदान करणारा देशातील पहिला उपक्रम-

जम्मू येथील एम्स रुग्णालयात सांगलीवरून आलेल्या सिंदूर रक्तदान महायात्रेचा भव्य समारोप शिवसेना मुख्य नेते, उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब आणि महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सांगलीतून आलेल्या रक्तवीरांची भेट घेऊन त्यांच्या नियोजनाची माहिती घेतली. मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी श्रीनगर, उद्यमपूर, आर्मी कमांड हॉस्पिटल १६६ आणि एम्स रुग्णालय येथे भेट देऊन रक्तवीरांशी संवाद साधला.
मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात व डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांच्या पुढाकाराने ही महायात्रा यशस्वी ठरली. ‘सिंदूर रक्तदान महायात्रा’ ही भारतीय सैनिकांना रक्तदान करणारा देशातील पहिला उपक्रम ठरला आहे. यावेळी एकूण १,२०० पैलवानांनी रक्तदान करून मानवतेचा महान आदर्श ठेवला. या उपक्रमातून शिवसेनेचे नाव जगभरात पोहोचत आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. एम्स रुग्णालयातील सर्व कर्मचारीवृंदांचे विशेष आभार मानले तसेच सर्व रक्तवीरांना मनःपूर्वक धन्यवाद देतो, असे यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हटले.

Breaking News

रत्नागिरी जिल्ह्यातील पाऊसदिनांक – 11/08/2025

१) मंडणगड - 12.25 मिमी२) खेड - 21.42 मिमी३)...

रत्नागिरी जि.प.विद्यार्थ्यांची ग्रँड कॅनियन व हूवर डॅमला भेट

विद्यार्थ्यांनी अमेरिकेतील प्रसिद्ध नैसर्गिक व अभियांत्रिकी अविष्कारांचा अनुभव घेतला....