यावेळी ना. उदय सामंत ह्यांनी श्री देवी भराडी मातेचे दर्शन घेतले आणि भविष्यात कोणावरही संकट येऊ नये यासाठी देवी चरणी प्रार्थना केली.
यासोबतच, आंगणे कुटुंबीयांनी मांडलेल्या विकासात्मक मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. आंगणे कुटुंबीयांना अभिप्रेत असलेला विकास लवकरच प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्न केले जातील असं वक्तव्य मा.उदय सामंत ह्यांनी केले. यावेळी ना. उदयजी सामंत ह्यांच्या शुभहस्ते पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुलाचे वाटप देखील करण्यात आले.
या प्रसंगी आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने आलेले भाविक उपस्थित होते.