सिद्धगिरी मठ (कणेरी मठ) हा महाराष्ट्रातील एक प्राचीन आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध केंद्र आहे. कोल्हापूरजवळ कणेरी येथे वसलेला हा मठ सद्गुरू परंपरा, संस्कार, सेवा आणि ग्रामीण जीवनमूल्यांच्या जतनासाठी ओळखला जातो. येथे आध्यात्मिक उपक्रम, पदयात्रा, कृषी प्रदर्शन, कृषी प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच समाजोपयोगी प्रकल्प नियमितपणे राबवले जातात.
यावर्षीच्या महाशिवरात्री निमित्त आयोजित दापोली–नारगोळी ते कणेरी मठ पायवारी
मध्ये सहभागी झालेल्या सर्व गुरुबंधू आणि गुरुबहिनींचे मनःपूर्वक कौतुक करावे तेवढे
तेवढे थोडेच आहे प्रामुख्याने आपल्या युवापिढीचे…..
त्याचप्रमाणे महिला भगिनी आणि सर्व वयोवृद्धांचेीउपस्थिती अत्यंत गौरवास्पद आहे.
सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे आपण सर्वांनी अत्यंत आनंदाने या पायवारी सहभाग घेतला. यावर्षीच्या या वारीतून प्रेरणा, दृढ श्रद्धा आणि सद्गुरूप्रती निष्ठा यांचे सुंदर दर्शन घडले.
आपल्या सर्वांच्या सेवाभावामुळे ही वारी खऱ्या अर्थाने यशस्वी ठरली.
सद्गुरूंचा आशीर्वाद सदैव राहो आणि पुढेही अशाच प्रकारे सेवा करण्याची संधी लाभो, हीच सद्गुरू चरणी प्रार्थना.
🙏
