रत्नागिरीसैनिकांच्या सन्मानासाठी महाराष्ट्राची राष्ट्रभक्ती कृतीत उतरली. ‘सिंदूर महारक्तदान’ यात्रेचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह...

सैनिकांच्या सन्मानासाठी महाराष्ट्राची राष्ट्रभक्ती कृतीत उतरली. ‘सिंदूर महारक्तदान’ यात्रेचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून कौतुक

सैनिकांच्या सन्मानासाठी महाराष्ट्राची राष्ट्रभक्ती कृतीत उतरली. ‘सिंदूर महारक्तदान’ यात्रेचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून कौतुक;

९ ऑगस्ट क्रांतिदिनाचे औचित्य साधून शिवसेनेच्या वतीने नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘सिंदूर महारक्तदान यात्रा आणि शिबिरा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी केंद्रीय संरक्षणमंत्री मा. श्री. राजनाथ सिंह आवर्जून उपस्थित राहिले. देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या जवानांना यावेळी कृतज्ञतापूर्वक सलाम करण्यात आला. सैनिकांच्या सन्मानासाठी आयोजित या अनोख्या उपक्रमाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी कौतुक केले.

‘सिंदूर महारक्तदान’ उपक्रमाचा हेतू केवळ रक्तसंकलन नसून, देशाच्या सीमेवर उभ्या असलेल्या सैनिकांच्या त्यागाची समाजाला जाणीव करून देणे आहे. महाराष्ट्रातील जवळपास १००० पैलवान या उपक्रमात सहभागी झाले.रक्तदान ही छोटी गोष्ट नाही. एखाद्याचा जीव वाचवण्याचे सामर्थ्य त्यात आहे. जवानांच्या सन्मानासाठी महाराष्ट्रातील पैलवानांनी घेतलेला पुढाकार प्रेरणादायी असल्याचे यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.

देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली भारत संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञान, क्षेपणास्त्र निर्मिती आणि देशांतर्गत संरक्षण उत्पादनाला मिळणारी चालना भारताचे संरक्षण कवच अधिक मजबूत करत असल्याचे मत शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.
या महारक्तदान शिबिरात माझ्या समवेत शिवसेना संसदीय पक्षाचे नेते तथा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही स्वतः रक्तदान करून एक आगळावेगळा आदर्श घालून दिला. लोकप्रतिनिधींनी स्वतः रक्तदानातून या उपक्रमात सहभाग घेतल्याने रक्तदात्यांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

याप्रसंगी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, उद्योगमंत्री डॉक्टर उदय सामंत शिवसेना संसदीय पक्षाचे नेते तथा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, व्हाइस ॲडमिरल आरती सरीन, लेफ्टनंट जनरल रणजीत सिंग, लेफ्टनंट जनरल नीरज सेठी, लेफ्टनंट जनरल अविनाश दास, राज्यसभा सदस्य प्रा. डॉ. ज्योती वाघमारे, महाराष्ट्र डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्यासह लष्करी अधिकारी, शिवसेना पदाधिकारी, पैलवान आणि शिवसैनिक उपस्थित होते.

Breaking News

Καταθέσεις στο καζίνο WinShark: Οδηγός

Πολλοί παίκτες προτιμούν να χρησιμοποιούν το casino-winshark.gr για τις...

MyStake Casino : Vérification & Sécurité

La confiance est primordiale lorsqu’on joue en ligne. Dans...