कोकण मराठी पत्रकार संस्थेतर्फे शाळा भोस्ते नं 1मधील शिक्षिका विद्या देवळेकर यांना शिक्षकरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले. राज्याचे गृहमंत्री योगेशदादा कदम, मराठी पत्रकार संस्थेचे अध्यक्ष एकनाथ बिरवटकर मुख्यकार्यवाह दिलीप देवळेकर तसेच ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर , वसईचे पत्रकार अनिलराज रोकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला. हा कार्यक्रम भरणे येथे नुकताच झाला. विद्या देवळेकर मॅडम यांनी हा पुरस्कार यांच्या कुटुंबा च्या उपस्थितीत स्विकारला. विद्या मॅडम ह्या गेली 22 वर्षे अध्यापन करतात. विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांचा शाळेत लौकिक आहे.त्या उत्कृष्ट कवयित्री लेखिका व राज्यस्तरीय शिक्षक ध्येय साप्ताहिक च्या उपसंपादिका आहेत. आजपर्यंत त्यांना अनेक प्रमाणपत्र व कला पुरस्कार मिळाले आहेत.त्यांनी केलेल्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्याची दखल कोकण पत्रकार संस्थेने घेऊन हा मानाचा पुरस्कार त्यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. तालुक्यातून अनेक मान्यवर यांच्यासह शिक्षक वर्ग यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांना शिक्षक रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक होत आहे.