रत्नागिरीस्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणूका २०२५. उमेदवाराने निवडणुकांमध्ये करावयाच्या खर्चाची मर्यादा आयोगाने...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणूका २०२५. उमेदवाराने निवडणुकांमध्ये करावयाच्या खर्चाची मर्यादा आयोगाने केली निश्चित!

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणूका २०२५ उमेदवाराने निवडणुकांमध्ये करावयाच्या खर्चाची मर्यादा निवडणूक आयोगा तर्फे निश्चित करण्यात आली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने निवडणूक खर्चाचा हिशोब आयोगाने निर्धारित केलेल्या कालावधीमध्ये आणि विहित केलेल्या रितीने सादर करण्यात कसूर करणाऱ्या उमेदवारास अनर्ह ठरविण्याची तरतूद मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ ध्या कलम १६ (१), महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम १० (१ई), महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या कलम १६ (१७), महाराष्ट्र जिल्हा परिषद, आणि पंचायत समिती अधिनियम, १९६१ चे कलम १५-ब (१) आणि ५८(१ई) व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम १४ ब (१) मध्ये करण्यात आली आहे.

उपरोक्त तरतुदीस अनुत्तरून राज्य निवडणूक आयोगाने संदर्भाधिन आदेशा विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकरीता उमेदवाराने करावयाच्या खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था सुधारीत खर्चाची मर्यादा पुढीलप्रमाणे आहे –

महानगरपालिका सदस्य
बृहन्मुंबई – १५,००,०००
अ वर्ग (पुणे व नागपूर) – १५,००,०००
ब वर्ग (पिंपरी-चिंचवड, नाशिक व ठाणे) – १३,००,०००
क वर्ग (कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर व वसई-विरार) – ११,००,०००/-
ड वर्ग (उर्वरित १९ महानगरपालिका) – ९,००,०००/-

नगरपरिषद / नगरपंचायत
थेट नगराध्यक्ष-
अ वर्ग नगर परिषद (न.प.) – १५,००,०००
सदस्य – ५,००,०००/-
ब वर्ग (न.प.) – ११,२५,०००
सदस्य – ३,५०,०००
क वर्ग (न.प.) – ७,५०,०००
सदस्य – २,५०,०००
नगर पंचायत
थेट नगराध्यक्ष- ६,००,०००/-
सदय – २,२५,०००/-
जिल्हा परिषद / पंचायत समिती
७१ ते ७५ निवडणूक विभाग
जिल्हा परिषद सदस्य – ९,००,०००/-
पंचायत समिती सदस्य – ६,००,०००/-
६१ ते ७० निवडणूक विभाग
जिल्हा परिषद सदस्य – ७,५०,०००
पंचायत समिती सदस्य – ५,२५,०००
५० ते ६० निवडणूक विभाग
जिल्हा परिषद सदस्य – ६,००,०००/-
पंचायत समिती सदस्य – ४,५०,०००/-

ग्रामपंचायत
सदस्य संख्या – ७ ते ९ सदस्य
थेट सरपंच – ७५,०००/-
सदस्य – ४०,०००/-
११ ते १३ सदस्य
थेट सरपंच – १,५०,०००
सदस्य – ५५,०००
१५ ते १७ सदस्य
थेट सरपंच- २,६५,०००
सदस्य- ७५,०००

Breaking News

कष्टकरी महिलांच्या कार्याला सलाम; ओमळीत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा

कष्टकरी महिलांच्या कार्याला सलाम; ओमळीत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरास्त्री...

आंबा बागायतदारांच्या नुकसान भरपाईसाठी मंत्रालयात बैठकीचे आयोजन

तालुकानिहाय विस्तृत वस्तुस्थितीचा अहवाल शासनाकडे पाठवा– पालकमंत्री डॉ. उदय...