रत्नागिरीस्मार्ट मिटर बसवूच नयेत या करीता रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हाचे चिफ इंजिनिअर श्री...

स्मार्ट मिटर बसवूच नयेत या करीता रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हाचे चिफ इंजिनिअर श्री अनिल डोये यांचे कार्यालयात काँग्रेस चे नेते अशोकराव जाधव माजी अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग प्रदेश काँग्रेस आणि शेतकरी कष्टकरी संघटनेच्या वतीने शिष्टमंडळा सहभेट

स्मार्ट मिटर बसवूच नयेत या करीता रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हाचे चिफ इंजिनिअर श्री अनिल डोये यांचे कार्यालयात काँग्रेस चे नेते अशोकराव जाधव माजी अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग प्रदेश काँग्रेस आणि शेतकरी कष्टकरी संघटनेच्या वतीने शिष्टमंडळा सहभेट घेतली तेव्हा सोबत प्रदिप खानविलकर, दिनानाथ पावस्कर, मंदार मुळ्ये , सोहम पोटफोडे, संतोष मयेकर, महेरा सावंत देसाई, प्रकाश मनगावकर, सागर सुर्वे, मकसुद लाला, सुनिल मोरे , सुहास मुळ्ये , पुरो षोत्तम नार्वेकर, दिपक चव्हाण, राजेंद्र चव्हाण, विजय पुनवालेकर, नितीन काळ्ये, निलेश काळ्ये, सोपान सुर्वे, नितीन सावंत, सुहास पाटील इत्यादी शिष्मंडळात सामिल झाले होते . या स्मार्ट मिटर जे खोटी कारणे सांगुन, विज ग्राहकांची फसवणूक करून तसेच स्मार्ट मिटर मुळे विजबिल चार ते पाच पटीने जादा येत आहे असे शिष्टमंडळाच्या वतीने पुराव्या सह अशोकराव जाधव यानी दाखवून दिले त्यावर ज्या ग्राहकांना जुन्या मिटरची बिले आणि स्मार्ट मिटरची आलेली वाढीव बिले जमा करून ती कमी करण्याचे सुचित केले . त्याच बरोबर ज्यांचे मिटर जुने फॉल्टी आहेत त्या ग्राहकानी आपण स्वःहा मिटर आणून तो विज मंडळा कडून पंजीकृत करून घेवून तोच बसवून घ्यायचा आहे . स्मार्ट मिटर बसवू द्यायचा नाही . स्मार्ट मिटर बसविण्यास येनारे लायमन हे कंत्राटी कंपनिचे आहेत महा .राज्य विज वितरण कंपनीचे नाहीत तरी अशा लाईन मन ला स्मार्ट मिटर बसवू द्यायचे नाहीत याची दक्षता विज ग्राहकानी घ्यायची आहे . असे आवहान अशोकराव जाधव यानी सर्व रत्नागिरी – सिंधुदूर्गा ती ल विज ग्राहकांना केले आहे . तसेच ज्या ग्राहकांच्या घरी अगर व्यवसाईकांच्या कडे जबरदस्तिने मिटर बसविणेस आलेल्या लाईनमन चा फोटो काढवा आणि स्मार्ट मिटरची गरज नसताना बसवित असलेची तक्रार लगतच्या, किंवा तालुक्याच्या पोलीस स्टेशनला करावी आणि तक्रारीची एक प्रत महावितरण कंपनिच्या अधिकाऱ्या कडे देवून पोच घ्यावी असे आवहन अशोकराव जाधव यानी केले आहे . या बाबत महाराष्ट्र सरकारने विधानसभेत विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षाला स्मार्ट मिटर बाबत चर्चाद्वारे जाब विचारला तेंव्हा सत्ताधारी यानी स्मार्ट मिटर बसविले जाणार नाहित असे जाहिर केले होते तरीही स्मार्ट मिटरची सक्ती, फसवणूक केली जात आहे हे निषेधार्त असलेचे शिष्मंडळाने नमुद केले आहे. ज्याच्या ज्याच्या कडे विज वितरण कंपनिचा मिटर आहे जे विज ग्राहक आहेत त्या सर्वानी या बाबत सर्वांना जागृत करावे असे आवाहन मा . अशोकराव जाधव यानी केले आहे.

Breaking News