रत्नागिरी, (जिमाका)- ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत अग्रणी जिल्हा व्यवस्थापक कार्यालय व नगर राजभाषा कार्यान्वयन समिती (नराकास) यांच्या संयुक्त विद्यमाने बँकर्स बाईक रॅली बँक ऑफ इंडिया विभागीय कार्यालय शिवाजीनगर ते जयस्तंभ आणि परत जयस्तंभ ते बँक ऑफ इंडिया विभागीय कार्यालय शिवाजीनगर पर्यंत काढण्यात आली.
बाईक रॅलीचा शुभारंभ विभागीय व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया तथा अध्यक्ष नराकास रविंद्र देवरे यांच्या हस्ते झाला. या रॅलीमध्ये उपविभागीय व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया अंजनी कुमार सिंग आझाद, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक दर्शन कानसे, नराकास सदस्य सचिव रमेश गायकवाड, झोनल सेक्रेटरी बँक ऑफ इंडिया ऑफिसर असोसिएशन किरण खोपडे, ललित प्रकाश दीपस्तंभ कार्यालय, भारतीय तटरक्षक वायू अवस्थानचे 24 जवान तसेच इतर नराकास सदस्य कार्यालये, शहरातील सर्व बँकांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. सर्वांनी रॅलीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शेवटी बँक ऑफ इंडिया विभागीय कार्यालय रत्नागिरी येथे श्री कानसे व श्री गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले व बाईक रॅलीची सांगता झाली.
