रत्नागिरीहातखंबा शाळेजवळ टँकर पलटी.भरधाव टँकरने रस्त्या शेजारील दुकाने उडवली. टँकर चालक जखमी....

हातखंबा शाळेजवळ टँकर पलटी.भरधाव टँकरने रस्त्या शेजारील दुकाने उडवली. टँकर चालक जखमी. सुदैवाने विद्यार्थी वाचले.. नागरिकांनी केला रास्ता रोको..

रत्नागिरी:- हातखंबा येथे पुन्हा एकदा अपघात झाला आहे. आज सकाळी भरधाव टँकरने रस्त्या शेजारी असलेल्या काही दुकानांना धडक दिली. मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात केवळ टँकर चालक जखमी झाला आहे. टँकरने धडक दिल्याने अनेक दुकानांचे नुकसान झाले असून मदतकार्य हाती घेण्यात आले आहे. दरम्यान लगत च्या शाळेतील विद्यार्थी सुदैवाने वाचले असल्याचे समोर आले आहे दरम्यान या अपघाताची जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाने गंभीर दखल घेतली आहे

Breaking News

सह्याद्री आय.टी.आय. सावर्डे मध्ये इलेक्ट्रिक व्हेईकल टेक्नॉलॉजी ट्रेनिंग संपन्न…

सह्याद्री आय.टी.आय. सावर्डे आणि नाईक, मोटर्स चिपळूण (महिंद्रा अँड...

रत्नागिरी जिल्ह्यातील पाऊसदिनांक – 22/09/2025

१) मंडणगड - 2.75 मिमी२) खेड - 44.85 मिमी३)...