रत्नागिरीहातखंब्यात गॅसचा टँकर पलटीः गॅस गळती झाल्याने महामार्ग ठप्प…! मध्यरात्रीची घटना

हातखंब्यात गॅसचा टँकर पलटीः गॅस गळती झाल्याने महामार्ग ठप्प…! मध्यरात्रीची घटना

वाहतूक सुरळीत होण्यासाठी सात ते आठ तासाचा अवधी लागणार.. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे
रत्नागिरी नजीकच्या हातखंबा तिठया जवळ टँकर पलटी झाल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे. गॅस गळती होत असून या अपघातामुळे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

एमआयडीसी ची टीम, जिल्हा प्रशासन व जिल्हा पोलीस यांनी योग्य ती परिस्थिती हाताळली असून तूर्तास गॅस गळती बंद केली आहे. इ आर बी व्हेईकल आल्यानंतर अपघातग्रस्त टँकर मधील गॅस शिफ्ट करण्यात येईल, तोपर्यंत दोन्ही बाजूचे ट्राफिक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आले आहे. एमआयडीसी ची टीम सध्या घटनास्थळी असून पालकमंत्री उदय सामंत यांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. इ आर बी व्हेईकल मध्ये गॅस शिफ्ट झाल्यानंतरच वाहतूक सुरळीत करण्यात येणार आहे. यासाठी किमान पाच ते सहा तास लागतील अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाडे यांनी दिली आहे.

गावातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

Breaking News