कोकणहापूसची पहिली पेटी मुंबईत दाखल

हापूसची पहिली पेटी मुंबईत दाखल

हापूसची पहिली पेटी मुंबईत दाखल

मुंबई :- देवगड तालुक्यातील पडवणे येथील आंबा बागायतदार
प्रकाश धोंडू शिर्सेकर यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर ६ डझन
हापूस आंब्यांची पेटी नवी मुंबई येथील वाशी मार्केटला
पाठवली आहे . या वर्षीच्या मोसमी हापूस आंब्यांच्या विक्रीचा
प्रारंभ या पेटीद्वारे झाला असून, हापूसच्या पहिल्या पेटीचा मान
शिर्सेकर यांना मिळाला आहे.
पडवणे गावातील शिर्सेकर यांच्या बागेत जुलै महिन्यात
तीन ते चार कलमांना आगाऊ मोहोर आला होता. त्यातील दोन
कलमांवरील मोहराचे त्यांनी प्लास्टिक आवरण घालून संरक्षण
केले होते. योग्य काळजी व फवारणीमुळे त्या कलमांवर सुमारे
पाच पेट्यांइतकी फळधारणा झाली. त्यापैकी पहिली पेटी
त्यांनी २० ऑक्टोबर रोजी वाशी मार्केटकडे रवाना केली. वाशी
येथील नानाभाऊ जेजुरकर अँड कंपनी या दलालामार्फत ही
आंबापेटी विक्रीस ठेवली जाणार असून, विक्री लक्ष्मीपूजनाच्या
दिवशी होणार आहे.

Breaking News