रत्नागिरीहाय सिक्युरिटी नंबर प्लेट'मुळे व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ; लाखो रुपयांच्या मशीन पडणार भंगारात--

हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’मुळे व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ; लाखो रुपयांच्या मशीन पडणार भंगारात–

रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यातील सर्वच जुन्या वाहनांनाही आता हाय सिक्युरिटी नंबर प्लेटची सक्ती करण्यात आली आहे. जानेवारी २०१९ पासून सर्व प्रकारच्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट अनिवार्य करण्यात आली आहे.
या प्लेट नसणाऱ्या वाहनांना ५ ते १० हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे.वाहनांची चोरी होऊ नये, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करता यावी यासाठी नवीन नियमानुसार १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आणि कलर कोटेड स्टिकर्स अनिवार्य केले आहेत. नंबरप्लेट वाहनाला लावल्यानंतर पुन्हा काढता येत नसून अत्याधुनिक तंत्रज्ञानाने नंबरप्लेट बनविलेली असते.त्यामुळे नंबरमध्ये छेडछाड करता येत नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सर्वच वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांक नंबरप्लेट अनिवार्य करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार परिवहन विभागाकडे ३१ मार्च २०२५ पर्यंत जुन्या वाहनांची नोंदणी करणे आणि त्यानंतरच्या तीन महिन्यात नंबर प्लेट बसविणे आवश्यक आहे.
व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ : दुसरीकडे मात्र रेडियमचे काम करणाऱ्या लाखो व्यावसायिकांवर संक्रांत कोसळल्याचे दिसत आहे. अनेकांचे रोजगार आणि कुटुंब उपासमारीच्या उंबरठ्यावर आहेत. नंबरप्लेट आणि रेडियमचा व्यवसाय हा मागणीअभावी आता बंद करावा लागणार असल्याचं दुकानदार बोलत आहेत. या केंद्र सरकारच्या नंबर प्लेटच्या आदेशामुळे सर्वच इंडस्ट्रीवर परिणाम होणार आहे.

नंबर प्लेटच्या नियमामुळे रेडियम व्यवसाय करणाऱ्या कारागिरांवर परिणाम होणार आहे, परंतु त्यांनी विकत घेतलेल्या लाखो रुपयांच्या मशीन आणि माल अडगळीत पडणार आहेत. अनेकांनी या मशिनसाठी लाखो रुपयांचे कर्ज घेतलंय, अशा वेळी आता परतफेड कधी अन् कशी करायची असा प्रश्न त्यांच्या समोर आहे.

Breaking News