रत्नागिरीहिंदू बांधवांची आषाढी एकादशी आणि मुस्लिम बांधवांचा यौमे आशुरा म्हणजेच मोहरम चा...

हिंदू बांधवांची आषाढी एकादशी आणि मुस्लिम बांधवांचा यौमे आशुरा म्हणजेच मोहरम चा दहावा दिवस एकाच दिवशी आल्याने रत्नागिरी जिल्हा पोलीस प्रशासना समोर प्रश्न चिन्ह उभा राहिला होता.

हिंदू बांधवांची आषाढी एकादशी आणि मुस्लिम बांधवांचा यौमे आशुरा म्हणजेच मोहरम चा दहावा दिवस एकाच दिवशी आल्याने रत्नागिरी जिल्हा पोलीस प्रशासना समोर प्रश्न चिन्ह उभा राहिला होता.परंतु रत्नागिरी जिल्ह्यात नव्याने दाखल झालेले दंबग पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी यापूर्वीच सामिजिक सलोखा समितीच्या माध्यमातून दोन्ही सामाजाच्या प्रमुख मंडळी च्या बैठका घेऊन येणारे सर्व सण उत्साहात आणि शांततेत साजरे करण्याचे आवाहन केले होते.. आणि त्यानुसार रविवारी रत्नागिरी सह जिल्ह्यात आषाढी एकादशी आणि मोहरम हे दोन्ही सण उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने शांततेत साजरे केले गेले… पोलीस अधीक्षक नितीन बगाटे हे तर राजापूर येथे मोहरम आणि आषाढी एकादशी मध्ये प्रत्यक्ष सहभागी झाले असल्याने एक प्रकारे राष्ट्रीय एकात्मता चे दर्शन दिसून आले त्यामुळे दोन्ही समाजाच्या नेते मंडळींनी समाधान व्यक्त केले आणि भविष्यात ही सर्व सण अशाच पद्धतीने साजरे केले जातील अशी ग्वाही दिली…

Breaking News