जिल्ह्यातील शाळांमध्ये विविध उपक्रम
रत्नागिरी, (जिमाका) : हिंद की चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे व प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी गटशिक्षणाधिकारी, शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य यांना लेखी सूचना दिल्या आहेत.
शाळांमध्ये प्रभातफेरी, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला, समूहगीत, प्रश्नमंजुषा असे उपक्रम 10 ते 28 फेब्रुवारीपर्यंत आयोजित कराव्यात, असे या पत्रात म्हटले आहे.
प्रभात फेरीचे आयोजन
दि यंग पिपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबई संचलित नॅशनल हायस्कूल मांदिवलीच्यावतीने हिंद दि चादर ‘ श्री.गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त प्रभात फेरी गावातून काढण्यात आली. प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक फैयाज सर यांनी मार्गदर्शन केले.
दापोली येथील ज्ञानदीप विद्यामंदिर, वेसवी पंचक्रोशी एज्युकेशन सोसायटी के.व्ही. भाटे विद्यामंदिर, फणसवळे शाळा क्र.1 , गावडे आंबेरे येथील विश्ववर विद्यामंदिर, डी.जे. सामंत इंग्लिश मेडियम स्कूल पाली, जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा मिरजोळे क्र.1, निर्मल ग्रामपंचायत कोलधे यांच्यामार्फतही गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. लांजा तालुक्यातील सापुचेतळे येथील जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक केंद्र शाळेत वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. प्रभातफेरीत शाळेतील विद्यार्थी, शिक्षक सहभागी झाले होते.
