रत्नागिरीहिंद की चादर : श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 शहिदी...

हिंद की चादर : श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 शहिदी समागम शताब्दी वर्षजिल्ह्यात विविध ठिकाणी आरोग्य शिबीरे

रत्नागिरी, (जिमाका) : हिंद की चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त जिल्ह्यातील शाळा, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, याठिकाणी आरोग्य शिबिरे घेण्यात आली. मंडणगड ग्रामीण रुग्णालय, रायपाटण ग्रामीण रुग्णालय, राजापूर ग्रामीण रुग्णालय, दापोली उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय लांजा, उपजिल्हा रुग्णालय कामथे, चिपळूण, ग्रामीण रुग्णालय संगमेश्वर, उपजिल्हा रुग्णालय कळबंणी, ग्रामीण रुग्णालय देवरुख या ठिकाणी तसेच शाळांमध्ये आरोग्य शिबीरे घेण्यात आली.
गुहागर येथील विद्यामंदिरात चित्रफीत प्रदर्शित
गुहागर येथील श्री देव गोपाळ माध्यमिक विद्यामंदिर तसेच जीवन शिक्षण शाळा क्र.१ येथे हिंद की चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या जीवनावर आधारित चित्रफीत प्रदर्शित करुन जनजागृती करण्यात आली.
रत्नागिरी तालुक्यातील डोर्ले येथील पोतकर गुरुजी विद्यामंदीरात निबंध स्पर्धा घेण्यात आली. वांजुळे येथील शिवाजी माध्यमिक विद्यालयात, खेड तालुक्यातील गुणदे येथील सद्गुरु काडसिध्देश्वर विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.

Breaking News