रत्नागिरीहेदवी, ता. गुहागर येथे हजारोंच्या संख्येने नागरिकांचा शिवसेनेत प्रवेश !

हेदवी, ता. गुहागर येथे हजारोंच्या संख्येने नागरिकांचा शिवसेनेत प्रवेश !

हेदवी, तालुका गुहागर येथे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते श्री. एकनाथ शिंदे व राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हजारोंच्या जनसमुदायासमोर शिवसेनेत जाहीर प्रवेश सोहळा पार पडला.


हा पक्षप्रवेश रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरणार आहे. सभागृहात दोन-तीन हजार लोकं जरी दिसत असले, तरी त्यांच्या पाठिशी उभे असलेले कुटुंब, समाज, समर्थक मिळून किमान दहा हजार मतदार शिवसेनेच्या विचारसरणीत दाखल झाले असल्याचं मतं यावेळी मा. उदय सामंत ह्यांनी व्यक्त केलं.

न्याय दिला, शब्द पाळला
नेत्राताईंचा नियोजन मंडळावरून अन्यायाने वगळल्याची घटना मनात होतीच.
पण आज साहेबांच्या उपस्थितीत सांगतो —
”नेत्राताई, मी तुझा भाऊ म्हणून तो न्याय परत देईन.” आज गुहागर तालुक्यातील सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ठामपणे सांगितलं 
”नेत्राताईंना महिलांच्या नेतृत्वाची संधी द्या.”
ही भावना हृदयाला भिडली, असे मा. ना. उदयजी सामंत म्हणाले.

महेश नाटेकरांचा पक्षप्रवेश –

शक्तीची जाणीव
समाजाचं नेतृत्व करणारे महेश नाटेकर आज शिवसेनेत दाखल झाले. ज्याच्या एका हाकेला खारवी समाज एकत्र येतो, अशा ताकदीचा नेता आज माननीय साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे, याचा मनापासून आनंद असल्याचे मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सांगितले.

विकास, विश्वास आणि विजय
गुहागरमध्ये जेव्हा धनुष्यबाण पराभूत झाला तेव्हा केवळ ११५० मतांचा फरक होता.
आजच्या पक्षप्रवेशासह ठाम सांगतो —
पुढच्या निवडणुकीत गुहागर मतदारसंघातून शिवसेनेचा आमदार निवडून येणारच!

शेवटी एक मनापासूनची गोष्ट…
मोठमोठे नेते पक्षात येतात, पण सर्वसामान्य भगिनीला ताकद देण्यासाठी शिवसेनेचा प्रमुख गावागावात स्वतः येतो, हे देशातलं पहिले उदाहरण!
यासाठी उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेबांना मनापासून धन्यवाद!
आणि जे टीका करतात त्यांना सांगू इच्छितो एकदा तरी चिपळूण, खेड, महाड किंवा पनवेलला या – इथले शेतकरी, महिला, युवक तुम्हाला सत्य दाखवतील…
हे नेतृत्व फक्त सत्तेचं नाही – हे नेतृत्व हक्काचं आहे, जनतेच्या हाकेला प्रतिसाद देणारं आहे, असे देखील मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हटले.

Breaking News