रत्नागिरी११ व्या डेरवण यूथ गेम्सला झाली सुरुवात--

११ व्या डेरवण यूथ गेम्सला झाली सुरुवात–

रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील एसव्हीजेसीटी च्या ‌क्रीडासंकुलात डेरवण यूथ गेम्स २०२५ चं आयोजन करण्यात आलं असून याचं उद्घाटन अर्जुन व द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या श्रीमती दीपाली देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलं.. मुंबई विद्यापीठातील सुवर्णपदक विजेता शिवा माळी यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून युथ गेम्सची सुरुवात करण्यात आली.

उद्योजक कमलेश जोशी यांनीही यावेळी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. स्पर्धेचं हे ११ वं वर्ष आहे. १७ मार्चपर्यंत चालणाऱ्या स्पर्धेत अ‍ॅथलेटिक्स, बॅडमिंटन, टेबल टेनिस, जलतरण, तिरंदाजी, नेमबाजी, बुद्धिबळ, कॅरम, लंगडी, खो-खो, कबड्डी, मल्लखांब, बास्केटबॉल, फुटबॉल, व्हॉलीबॉल अशा विविध खेळांच्या स्पर्धा होणार आहेत. त्यासाठी मुंबई, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद या राज्याच्या विविध भागांतून खेळाडू व संघ डेरवण येथे दाखल होत आहेत. सुमारे ६ हजार खेळाडूंनी या क्रीडा महोत्सवात सहभागी होण्यासाठी नोंदणी केली आहे.उद्योजक कमलेश जोशी यांनी या वेळी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या क्रीडा महोत्सवाची सुरुवात कॅरम, फुटबॉल, खो-खो, लंगडी या खेळांनी करण्यात आली.

Breaking News