रत्नागिरी📻 आकाशवाणीची गौरवशाली मैफिल, माझ्यासाठी ठरली अविस्मरणीय आठवण

📻 आकाशवाणीची गौरवशाली मैफिल, माझ्यासाठी ठरली अविस्मरणीय आठवण

📻 आकाशवाणीची गौरवशाली मैफिल, माझ्यासाठी ठरली अविस्मरणीय आठवण!

आकाशवाणीच्या गौरवशाली प्रसारणाच्या 90 व्या वर्षपूर्तीनिमित्त आकाशवाणी रत्नागिरी केंद्रांतर्फे आयोजित सुगम संगीत मैफिल रंगवण्याचे सदभाग्य मला लाभले. कलाकारासाठी प्रत्येक मैफिल विशेष असते, पण काही मैफिली आपल्या आयुष्यात खास म्हणून येतात आणि त्या मैफिलीत गायला मिळणे हे आपल्यासाठी गौरवशाली असते. कालच्या मैफिलीनंतर माझ्या मनात अशीच भावना होती. ज्या आकाशवाणीने माझ्यावर सुसंस्कार केले, त्या आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या प्रवासात मलाही एक पुष्प गुंफता आले ही माझ्यासाठी निश्चितच भाग्याची गोष्ट होती.

आकाशवाणीचा कार्यक्रम आणि पुण्यात आल्यानंतर सुमारे 8 वर्षांच्या मोठ्या अवकाशानंतर मी रत्नागिरीत स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात गाणार होतो, त्यामुळे दडपण आणि जबाबदारी होती. पण मैफिलीला सुरुवात झाली आणि उत्तरोत्तर मैफिल रंगत गेली. मैफिल संपल्यावर सर्वांच्या प्रतिक्रिया आणि चेहरे बोलके होते. सर्वांनी मनापासून कौतुक केले. सर्व गाणी खूप सुंदर झाली. सहगायिका वैदेही करंबेळकर ही सुद्धा खूप सुंदर गायली. महेश दामले (हार्मोनियम), राजू किल्लेकर ( सिंथेसायझर), उदय गोखले ( व्हायोलीन ), प्रथमेश देवधर ( तबला ) या सर्व वादक कलाकारांनी अप्रतिम साथ केली. त्यामुळे कार्यक्रम उठावदार झाला. आकाशवाणीच्या प्रसिद्ध ज्येष्ठ निवेदिका निशा काळे यांच्यासोबतची ही माझी पहिलीच मैफिल. त्यांना रेडिओवर ऐकणे सुखकारक असायचे. त्या मैफिलीला निवेदनाला असण्याचा योग कधी जुळून आला नव्हता. ती कमी या मैफिलीने पूर्ण केली. अर्थातच अप्रतिम निवेदन! गाण्यांसंदर्भातील निवेदनाबरोबरच आकाशवाणीच्या आठवणींना त्यांनी दिलेला उजाळा सर्वांना भावला. ओघवते निवेदन आणि रसिकांच्या काना-मनाची पकड निवेदकाने कशी घ्यावी हे त्यांच्याकडून शिकावे. त्यांच्यासह आमची गुणी गायिका व आकाशवाणीत आता निवेदक म्हणून कार्यरत असलेल्या कश्मीरानेही निशाताईंसोबत अप्रतिम निवेदन केले. निशा काळेंच्याच शब्दांत सांगायचे तर आमच्या दोघींत वयाचे खूप अंतर आहे, पण आम्ही निवेदनात अंतर पडू दिले नाही. या मैफिलीला कळस चढवला तो उदयदादा अर्थात उदयराज सावंत यांच्या साऊंडने! खूप वर्षानी दादाच्या साऊंडवर मनसोक्त गाता आले. दादानेही अप्रतिम साऊंड लावलेली. त्यामुळे कार्यक्रम सर्वांच्या कानातून मनात उतरला आणि अविस्मरणीय झाला. एकंदर हा कार्यक्रम माझ्यासाठी आठवणीतील सर्वात वरच्या स्थानावर राहणारा कार्यक्रम होता.

या मैफिलीला रत्नागिरीतील अनेक दिग्गज व्यक्तीत्त्व उपस्थित होती. यात मोठे नाव म्हणजे प्रसिद्ध शास्त्रीय गायक प्रसादजी गुळवणी सर. त्यांच्यासमोर गाताना मनावर मोठे दडपण होते, पण धीर करून गायलो. विशेष म्हणजे सकाळीच त्यांनी स्वतःहून मेसेज करून चांगला झाला कार्यक्रम म्हणून आवर्जून सांगितले. तसेच तुझ्या आवाजात गोडवा आणि पूर्वीपासून तुझा आवाज मला आवडत असल्याचे सांगितले. त्यांच्या या शब्दांनी मी आज भरून पावलो. इतक्या मोठ्या व्यक्तीने आपल्याबद्दल कौतुकाचे बोल बोलणे मोठी गोष्ट आहे. हिच माझी सांगितिक प्रवासातील शिदोरी आहे. गुळवणी सरांसह सुहासजी विद्वांस, खल्वायन संस्थेचे श्रीनिवास जोशी, अनुया बाम, माझे पत्रकार मित्र राजेश चव्हाण, विजय पाडावे, अनघा निकम मॅडम, आकाशवाणीचे अभियंता अजीज नाकाडे सर्व स्टाफ आदी अनेक मंडळी उपस्थित होती.

स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहाच्या रंगमंचावर बुधवार दिनांक 20 मे रोजी आकाशवाणीच्या नियमानुसार अत्यंत काटेकोरपणे सायंकाळी 7 वाजता वेळेत मैफिलीला प्रारंभ झाला आणि बरोबर 9 वाजता मैफिल संपली. या मैफिलीसाठी मला आवर्जून बोलावल्याबद्दल आकाशवाणी रत्नागिरी केंद्र कार्यालय प्रमुख श्री. अधीर गढपाले आणि कार्यक्रम प्रमुख डॉ. सुनील गायकवाड, तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रबद्ध नियोजन करणाऱ्या श्री. विवेक वानखडे यांचे मनापासून धन्यवाद. आकाशवाणीच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक धन्यवाद!☘️🌹🙏🏻

  • अभिजीत नांदगावकर

Breaking News

Що казино вважають бонусним зловживанням

Що казино вважають бонусним зловживаннямНа підлозі казино це видно...

Da Vinci Diamonds Dual vs Yum Yum Powerways Στην Πράξη

Da Vinci Diamonds Dual vs Yum Yum Powerways Στην...