आपण सोमवारी 10 मार्च रोजी पदभार स्वीकारणार असल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वैदवी मनोज रानाडे यांनी दिली आहे...
वैदवी मनोज रानाडे यांनी चार वर्षे रत्नागिरी येथे उपजिल्हाधिकारी म्हणून निवडणूक विभागात काम केले आहे तसेच प्रांत. अप्पर जिल्हाधिकारी आदी शासनाच्या विविध विभागात महत्वपूर्ण पदावर काम केले असल्याने त्यांना प्रशासनाचा उत्तम अनुभव आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्या नक्कीच चांगले काम करतील अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली..