रत्नागिरी12 वी, 10 वी परीक्षेसाठी राज्य मंडळ स्तरावर समुपदेशक नियुक्त

12 वी, 10 वी परीक्षेसाठी राज्य मंडळ स्तरावर समुपदेशक नियुक्त


रत्नागिरी : परीक्षेच्या काळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भितीने मानसिक दडपणाखाली असतात, अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन करण्या साठी राज्य मंडळ स्तरावर समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य मंडळ सचिव डॉ. माधुरी सावरकर यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च तसेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 वी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या कालावधीत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या विभागीय मंडळां मार्फत आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
परीक्षेच्या काळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भितीने मानसिक दडपणाखाली असतात,अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन करण्याठी राज्य मंडळस्तरावर समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक. पुढील प्रमाणे आहेत. 9011302997, 8263876896, 8767753069, 7387400970, 9960644411, 7208775115, 8169202214, 9834084593, 8329230022 आणि 9552982115.
लेखी परीक्षेपूर्वी, परीक्षा कालावधीत सकाळी 8 ते रात्री 8 या कालावधीत विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीद्वारे निःशुल्क आवश्यक ते समुपदेशन करतील. मात्र, विद्यार्थी, पालक यांनी परीक्षे केंद्र, बैठक व्यवस्था, प्रश्न पत्रिके संबंधीत प्रश्न इत्यादीबाबत समुपदेशकांना विचारणा करु नये, याची नोंद घ्यावी.

Breaking News