रत्नागिरी135 वी डाक अदालत 29 जून रोजी मुंबईत

135 वी डाक अदालत 29 जून रोजी मुंबईत

135 वी डाक अदालत 29 जून रोजी मुंबईत
रत्नागिरी, (जिमाका) :- मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई द्वारे 29 जून 2026 रोजी दुपारी 4 वाजता दुसरा मजला, जी.पी.ओ. इमारत, मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांच्या कार्यालयामध्ये 135 वी डाक अदालत आयोजित करण्यात येणार आहे. संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार सहायक निदेशक डाकसेवा (ग्राहक संतुष्टी) आणि सचिव, डाक अदालत, मुख्य पोस्टमास्तर जनरल, यांचे कार्यालय, मुंबई एनेक्स बिल्डिंग, जी. पी. ओ. इमारत, चौथा माळा, मुंबई 400001 यांचे नावे दोन प्रतिसह 11 जून 2026 पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहोचेल अशारितीने पाठवावी त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही.
महाराष्ट्र आणि गोवा राज्याशी संबंधित पोस्टाच्या सेवे विषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवडयांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतमध्ये दखल घेतली जाईल. विशेषतः टपाल वस्तू / मनीऑर्डर / बचत बँक खाते / प्रमाणपत्र इत्यादी बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठवली असेल त्याचे नाव हुद्दा इत्यादी सर्व तपशीलासह केलेला असावा.

Breaking News

खेलो इंडिया अंतर्गत प्रशिक्षक नियुक्तीसाठी 29 मे पर्यंत मुदतवाढ

खेलो इंडिया अंतर्गत प्रशिक्षक नियुक्तीसाठी 29 मे पर्यंत मुदतवाढरत्नागिरी,...