रत्नागिरी, (जिमाका): सदस्य तथा सक्षम प्राधिकारी, जिल्हा निवड समिती, सांगली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज, पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, सांगली व आरोग्य शिक्षण पथक, तासगाव गट-ड वर्ग संवर्गातील उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा (Computer Based Test) दि. 31 डिसेंबर 2025 रोजी होत आहे. या दिवशी परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात दुपारी 12 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी लागू केले आहेत.
सदस्य तथा सक्षम प्राधिकारी, जिल्हा निवड समिती, सांगली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज, पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, सांगली व आरोग्य शिक्षण पथक, तासगाव यांजकडील पत्र क्र.शावैममिशावमरुमिपवपाशारुसांआशिपत/गट-ड/11593/2025, दि. 24 डिसेंबर 2025 च्या पत्रान्वये गट-ड वर्ग संवर्गाची सरळसेवा भरती प्रक्रिया सुरु असून उमेदवारांची ऑनलाईन परिक्षा (Computer Based Test) दि. 31 डिसेंबर 2025 रोजी दुपारी सत्रामध्ये राजेंद्र माने कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी आंबव, मु.पो. आंबव देवरुख, ता. संगमेश्वर या परिक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. ही परीक्षा दुपारच्या सत्रात घेण्यात येणार आहे.
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 प्रमाणे प्राप्त झालेल्या अधिकारान्वये परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात परीक्षेच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तसेच परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी 31 डिसेंबर 2025 रोजी परीक्षेच्या दिवशी दुपारी 12 वाजलेपासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी लागू केले आहेत.*
या आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या परिसरात परिक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा होईल असे कृत्य करण्यात येणार नाही. 100 मीटर परिसरातील एस.टी.डी. बुथ, झेरॉक्स सेंटर, टायपिंग सेंटर, ध्वनीक्षेपण इ. माध्यमे आदेशाची मुदत संपेपर्यंत बंद राहतील. परीक्षा केंद्राच्या परिसरात मोबाईल फोन, सेल्यूलर फोन, फॅक्स, ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेवून प्रवेश करण्यास मनाई असेल. कोणत्याही व्यक्तीकडून परीक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पडण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करण्यास मनाई असेल. परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस / वाहनास प्रवेशास मनाई राहील.
हे आदेश परीक्षा केंद्रावर काम करणारे अधिकारी/कर्मचारी तसेच परीक्षा केंद्रावर निगराणी करणारे अधिकारी/पोलीस अधिकारी यांच्याबाबत त्यांचे परीक्षा संबंधी कर्तव्य पार पाडण्याच्या अनुषंगाने लागू राहणार नाहीत. मात्र, त्यांना गैरप्रकार करण्यास प्रतिबंध राहील.
या आदेशाची जो अवमान्यता करील तो भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 223 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.
000
