रत्नागिरी5 जानेवारीला जिल्हास्तरीय लोकशाही दिन

5 जानेवारीला जिल्हास्तरीय लोकशाही दिन

रत्नागिरी, (जिमाका) : जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. माहे जानेवारी 2026 चा लोकशाही दिन सोमवार दि. 5 जानेवारी 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी 1 ते 2 वाजता या वेळेत होणार आहे.
लोकशाही दिनाकरिता नागरिकांनी प्रथम तालुका लोकशाही दिनात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. तालुका लोकशाही दिनातील उत्तराने समाधान न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्जदार अर्ज सादर करु शकतात, असे उपजिल्हाधिकारी (सा.प्र) विश्वजीत गाताडे यांनी कळविले आहे.

Breaking News