महाड MIDC मध्ये मोठा स्फोट!
Synergia Chem Industries, Plot No. C-57, MIDC महाड, रायगड येथे रात्रीच्या सुमारास मोठा स्फोट झाला आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या व्हिडिओमध्ये कंपनीच्या प्लांटमधून आगीचे आणि धुराचे प्रचंड मोठे लोट आकाशात जाताना दिसत आहेत. स्फोटाचा आवाज दूरवर ऐकू आला.
आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू केले आहे
नागरिकांनी त्या परिसरात जाणे टाळावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.उशिरा मिळालेल्या माहितीनुसार आग आटोक्यात आणण्यास यश आले असून पुढील तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले
