रत्नागिरीनशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
मेरा युवा भारत आणि स्वामी बाळ सत्यधारी महाराज व्यसनमुक्ती केंद्राचा संयुक्त पुढाकार
रत्नागिरी,  (जिमाका) : सक्षम आणि सुदृढ भावी पिढी घडवण्याच्या उद्देशाने, ‘मेरा युवा भारत’ आणि स्वामी बाळ सत्यधारी महाराज व्यसनमुक्ती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने “नशामुक्त युवा फॉर विकसित भारत” या विशेष प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी व्यसनमुक्ती आणि उत्तम शारीरिक व मानसिक आरोग्य किती गरजेचे आहे, याविषयी तरुणांमध्ये जनजागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता.
या कार्यक्रमात नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी सम्राट पाटील यांनी तरुणांशी संवाद साधत व्यसनमुक्ती आणि आरोग्य संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. निरोगी शरीर आणि व्यसनमुक्त जीवनशैली हीच राष्ट्र उभारणीची खरी ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमास जिल्हा माहिती अधिकारी शप्रशांत सातपुते यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तरुणांपर्यंत सकारात्मक विचार आणि माहिती पोहोचवण्यासाठी प्रशासन सदैव कटिबद्ध असल्याचे यावेळी अधोरेखित झाले.
केवळ पारंपरिक व्यसनांपासूनच नव्हे, तर आधुनिक काळातील डिजिटल धोक्यांपासूनही तरुणांचे रक्षण व्हावे, या उद्देशाने रत्नागिरी सायबर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक स्मिता सुतार यांची कार्यक्रमास विशेष उपस्थिती होती. त्यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्हेगारी आणि ऑनलाइन सुरक्षिततेविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
तरुणांना जबाबदार, निरोगी आणि सुरक्षित बनवण्याच्या दिशेने टाकलेले हे पाऊल ठरले असून, या सामाजिक उपक्रमास उपस्थित युवकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

Breaking News

जिल्हा शालेय कुस्ती स्पर्धेत तब्बल २२५ विद्यार्थ्यांचा सहभाग

जिल्हा शालेय कुस्ती स्पर्धेत तब्बल २२५ विद्यार्थ्यांचा सहभाग रत्नागिरी :...

खादी-ग्रामोद्योगातून आत्मनिर्भर महाराष्ट्राची वाटचाल – उद्योगमंत्री डॉक्टर उदय सामंत

खादी-ग्रामोद्योगातून आत्मनिर्भर महाराष्ट्राची वाटचाल!उद्योगमंत्री डॉक्टर उदय सामंत---👉राष्ट्रपिता महात्मा गांधी...