खादी-ग्रामोद्योगातून आत्मनिर्भर महाराष्ट्राची वाटचाल!
उद्योगमंत्री डॉक्टर उदय सामंत—
👉राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित खादी व ग्रामोद्योग उत्पादनांच्या प्रदर्शनाला राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी भेट दिली.
यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी या प्रदर्शनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध संस्था, महिला बचतगट, कारागीर आणि लघुउद्योजकांनी तयार केलेल्या खादी, मध, नैसर्गिक उत्पादने, ड्रायफ्रूट्स, हळद, लेदर उत्पादने तसेच विविध हस्तकलेच्या वस्तूंची माहिती घेतली.
स्थानिक कौशल्य, पारंपरिक व्यवसाय आणि आधुनिक बाजारपेठ यांची सांगड घालत गावागावातील उद्योजकांना सक्षम करण्याचा आणि त्यांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा महाराष्ट्र शासनाचा प्रयत्न आहे. खादी आणि ग्रामोद्योग हे केवळ रोजगाराचे साधन नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारे आणि ‘आत्मनिर्भर महाराष्ट्र’ घडविणारे महत्त्वाचे माध्यम आहे. हे प्रदर्शन २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२६ पर्यंत सुरु राहणार आहे. स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देऊया…महाराष्ट्रातील उद्योजकांना बळ देऊया, असे आवाहन यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी केले.
