रत्नागिरीमिरजोळे येथे पोषण माह व सेवा संकल्प अभियानांतर्गत महिला मेळावा संपन्न

मिरजोळे येथे पोषण माह व सेवा संकल्प अभियानांतर्गत महिला मेळावा संपन्न

मिरजोळे येथे पोषण माह व सेवा संकल्प अभियानांतर्गत महिला मेळावा संपन्न
रत्नागिरी, (जिमाका) : कोतवडे-१ बीट अंतर्गत मिरजोळे ग्रामपंचायत येथे राष्ट्रीय पोषण माह तसेच सेवा संकल्प अभियानाचे औचित्य साधून विशेष महिला मेळाव्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात महिलांचे आरोग्य, पोषण आणि बालसंगोपनावर विशेष भर देण्यात आला.
मेळाव्यामध्ये उपस्थित महिलांची हिमोग्लोबिन (Hb) तपासणी करण्यात आली. तसेच गरोदर मातांना ‘बेबी केअर किट’चे वितरण करण्यात आले व नवजात बालकांचे कौतुकपर स्वागत करण्यात आले. महिला व बालकांच्या आरोग्यासाठी आहाराचे महत्त्व स्पष्ट करताना सुदृढ आहाराबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी अंगणवाडीमार्फत दिल्या जाणाऱ्या विविध लोककल्याणकारी सेवांवर आधारित आकर्षक रांगोळी तसेच सकस व पौष्टिक आहार घटकांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.
कार्यक्रमास बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री. चव्हाण यांनी उपस्थित राहून महिला व बालकांच्या पोषण व आरोग्याविषयी मार्गदर्शन केले. बीट पर्यवेक्षिका यांनीही विविध शासकीय योजनांची माहिती दिली.
या शिबिरात आशा स्वयंसेविका व एएनएम (आरोग्य सेविका) यांनी उपस्थित महिलांची प्रत्यक्ष हिमोग्लोबिन तपासणी केली. या महिला मेळाव्याला स्थानिक महिला, माता व अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Breaking News

राजापूर हायस्कूलमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ उत्साहात

राजापूर हायस्कूलमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ उत्साहात; विद्यार्थिनींना महिला व...

शैक्षणिक इतिहासातील सुवर्णक्षण; केंद्रीय विद्यालयाचा प्रवेशोत्सव आणि टिळक विद्यालयाच्या पुनर्बांधणीचे लोकार्पण

शैक्षणिक इतिहासातील सुवर्णक्षण; केंद्रीय विद्यालयाचा प्रवेशोत्सव आणि टिळक विद्यालयाच्या...