रत्नागिरीशासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे २४ वे देहदान…

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे २४ वे देहदान…

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे २४ वे देहदान…

कै. तुकाराम शंकर बनप, वय – ८३ वर्ष, राहणार – काळबादेवी , रत्नागिरी यांचे दि.०५/१०/२०२६ रोजी अल्पशा आजाराने शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे निधन झाले. कै.तुकाराम बनप यांनी दि.२९/०१/२०२५ रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे मरणोत्तर देहदान इच्छापत्र अर्ज केला होता. त्यानुसार कै.तुकाराम बनप यांचे कुटुंबीय यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी व संशोधनासाठी देहाचा उपयोग व्हावा या उदात्त उद्देशाने दि. ०६/१०/२०२६ रोजी देहदान केले.
कै. तुकाराम बनप यांनी जी. एम . शेट्ये , हायस्कुल,बसणी येथे मुख्य लिपिक म्हणून काम केले होते. काळबादेवी गावात त्यांना मानणारे अनेक ग्रामस्थ आहेत.काळबादेवीत असताना ग्रामस्थांच्या एकोप्यासाठी त्यांनी नेहमी प्रयत्न केले.आपल्या वाडीच्या कार्यात त्यांचा खूप मोठा सहभाग होता. आपल्या वाडीला एकत्रित बांधून ठेवायचं काम त्यांनी अनेक वर्षे कोणालाही न दुखवता निस्वार्थीपणे केले व शेवटी या जगातून निघून जातानाही त्यांनी आपला देह समाज कल्याणासाठीच दिला.यावरुन त्यांची समाजासाठी झटण्याची परोपकारी, निस्वार्थी वृत्तीच दिसून येते अशी प्रतिक्रिया काळबादेवीतील एक जेष्ठ ग्रामस्थ श्री.अशोक मयेकर यांनी व्यक्त केली
सदर मरणोत्तर देहदान वेळी कै. तुकाराम बनप यांचे मुलगे मिलिंद , प्रीतम व प्रशांत बनप, सुना, नातवंडे,इतर नातेवाईक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच बसणी पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे सचिव बापू गवाणकर , सदस्य संजय वारेकर व मारुती मयेकर व काळबादेवीतील सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण मयेकर , रवी सुर्वे , जयवंत मयेकर , बंड्या पेटकर , विनय मयेकर , विवेक मयेकर यांच्यासहित काळबादेवीतील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली .
कै.तुकाराम बनप यांची नात पायल मिलिंद बनप हीने अलिकडेच बीएचएमएस ची अंतिम वर्षाची परीक्षा उत्तीर्ण होऊन आपले मेडिकल कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले आहे त्याचवेळी पायलचे आजोबा कै.तुकाराम बनप यांनी रत्नागिरीतील मेडिकल कॉलेज ला मरणोत्तर देहदान केल्याने बनप कुटुंबीयाचे वैद्यकीय क्षेत्राशी वेगळे ऋणानुबंध जोडले गेले आहेत .
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरीचे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. सादिकअली सय्यद, डॉ.योगिता कांबळे, समाजसेवा अधीक्षक श्री.रेशम जाधव व शरीरचनाशास्त्र विभागातील पूर्वा तोडणकर ,भूमी पारकर, प्रियल आडीवरेकर, मिथिलेश मुरकर, मिहीर लोंढे,श्रेयश जोशी, राज पेडणेकर, तसेच वाहन चालक – प्रीतम भोसले यांनी काम पाहिले.

Breaking News