देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षाच्या जनसेवेवर विश्वास ठेवून, आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्य नेतृत्वावर विश्वास ठेवून, व भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्रभाऊ चव्हाण यांच्या प्रदेश अध्यक्षते खाली भरणे ग्रामपंचायत विभागा मधील विविध पक्षातील शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख यांच्यासह सह असंख्य महिलांचा भाजपा नेते वैभवजी खेडेकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे.
भारतीय जनता पार्टीचे बूथ अध्यक्ष श्री. साईराज पवार व भाजप कार्यकर्ते श्री. संतोष यादव यांच्या माध्यमातून श्री. रुपेश काते , भिकू शिगवण काका, श्री. चंद्रशेखर हेळगावकर यांच्यासह राजाराम लाड , उदय पांढरे , सुरज लाड, सुमित पाटील, अथर्व काते, रुपेश जाधव, राजू मांडवकर, नितीन डांगरे, अनिता शिगवण, हेमलता यादव, वैशाली काते, धनश्री काते, स्वरूपा खेडेकर, रिया महागावकर, शिवकन्या बांगर, सुमन शेले, योगिता बांगर, रामचंद्र डांगरे यांनी भाजपा नेते मा. नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला.
सदर वेळी भाजपा युवा मोर्चा प्रदेश कार्यकारणी सचिव. मिलिंद नांदगावकर, भाजपा तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, गटनेते नगरसेवक. रहीम सहिबोले , भाजपा शहराध्यक्ष भालचंद्र नंदू साळवी , वाहतूक सेल तालुकाध्यक्ष सुयश खेडेकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विशाल होळकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष स्वराज गांधी, शक्ती केंद्रप्रमुख वैजेश सागवेकर, प्रथमेश सुर्वे, अनिकेत पवार, सरचिटणीस विजय गुप्ता, नगरसेवक संदेश भुवड, अविराज मोरे त्यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
