रत्नागिरीप्राथमिक शाळा खेर्डी चिंचघरी येथील विद्यार्थ्यांना जिजाऊ फाउंडेशनच्या वतीने वह्या वाटप कार्यक्रम...

प्राथमिक शाळा खेर्डी चिंचघरी येथील विद्यार्थ्यांना जिजाऊ फाउंडेशनच्या वतीने वह्या वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न

प्राथमिक शाळा खेर्डी चिंचघरी येथील विद्यार्थ्यांना जिजाऊ फाउंडेशनच्या वतीने वह्या वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न–

प्राथमिक शाळा खेर्डी-चिंचघरी (सती) या विद्यालयात जिजाऊ फाउंडेशनच्या वतीने येथील विद्यार्थ्यांना श्री. भगवान सांबरे साहेब यांच्या पुढाकाराने वह्या वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, त्यांच्यात शिक्षणाविषयी आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळावी या उद्देशाने श्री निलेश सांबरे सरांनी हा उपक्रम राबविला आहे. शिक्षण , आरोग्या, स्पर्धा परीक्षा आणि महिला सक्षमीकरण हे कार्य ते जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेमार्फत करतात .
या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री. सकपाळ सर, जिजाऊ फाउंडेशनचे राज्य प्रवक्ते अमर राऊत, तालुकाध्यक्ष अनंत डिंगणकर उपस्थित होते. विद्यार्थ्यांना वह्या वाटप उपस्थित मान्यवर , शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिजाऊ फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व करिअर मार्गदर्शनाचे उपक्रमही राबविण्यात येत असल्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणाबरोबरच विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करावी, आपल्या आवडीच्या क्षेत्राची निवड करून भविष्यातील ध्येय निश्चित करावे आणि उपलब्ध मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी जिजाऊ फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येणारा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. या उपक्रमाबद्दल शाळेच्या वतीने जिजाऊ फाउंडेशन, श्री. भगवान सांबरे साहेब व उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करण्यात आले.

Breaking News

कोकण रेल्वेने वाहिली शहीदा ना आदरांजली

कोकण रेल्वेने वाहिली शहीदा ना आदरांजली. रत्नागिरी:- कोकण रेल्वेने आज...