महाराष्ट्रजोशी-बेडेकर महाविद्यालय, ठाणे येथे मराठी भाषा गौरव दिन सोहळा व मराठी उद्योजक...

जोशी-बेडेकर महाविद्यालय, ठाणे येथे मराठी भाषा गौरव दिन सोहळा व मराठी उद्योजक सन्मान सोहळ्याला राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत ह्यांनी उपस्थिती दर्शवली.

यावेळी मराठी भाषेच्या प्रचार व प्रसारा सोबतच कला आणि संस्कृती जपण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. तसेच, मराठी भाषेसह मोठ्या प्रमाणावर मराठी नवउद्योजक घडवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे यावेळी ना. उदय सामंत ह्यांनी सांगितले.
याप्रसंगी पद्मश्री अच्युत पालव, जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक, ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, साहित्यिक डॉ. प्रदीप ढवळ, दैनिक पुढारीचे निवासी संपादक शशिकांत सावंत, तसेच महेश केळुस्कर, डॉ. रामकृष्णदास महाराज आणि मुद्रांक विभागाचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण जाधव उपस्थित होते.

Breaking News