भाटकर कुटुंबीयांची आमदार प्रमोद जठार यांनी घेतली भेट
दुर्देवी घडलेल्या प्रसंगातुन कुटुंबीय सावरूदे, जठार यांनी केले सांत्वन
नाणार-इंगळवाडी खाडीपात्रात बुडून तीन चिमुकल्यांचा मृत्यू झालेल्या भाटकर कुटुंबीयांची आमदार प्रमोद जठार यांनी भेट घेऊन सांत्वन केले. या दुःखद प्रसंगी त्यांनी कुटुंबीयांना आर्थिक मदत केली.
उशिरा मोहम्मद (वय ६), जुहेरिया (वय ९) आणि बुशिरा (वय ११) या तिघांचे मृतदेह हाती लागले. डोळ्यांसमोर मुलांवर संकट कोसळल्याचा प्रसंग आणि त्यानंतर तीन मुलांचे मृतदेह हाती येण्याचे दुःख, या आघाताने जुनेद भाटकर आणि त्यांच्या पत्नी हिना भाटकर यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अजून १५ वर्षीय माहिराच्या शोधासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती घेत आमदार जठार यांनी प्रशासनाशी संपर्क साधून कुटुंबीयांना तातडीने आवश्यक ती शासकीय मदत मिळवून देण्याच्या सूचना केल्या. तसेच माहिराच्या शोधासाठी NDRF पथकाची मदत मिळावी, यासाठीही त्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला.
तीन चिमुकल्यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत असताना, बेपत्ता माहिराचा लवकरात लवकर शोध लागावा, यासाठी आम्ही प्रशासनान सर्वतोपरी प्रयत्न करनार, असा विश्वास यावेळी आमदार जठार यांनी दिला.
