ऐतिहासिक चवदार तळे सुशोभीकरण कामाची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली पाहणी–
महाड/ रायगड महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी चवदारतळे पाण्याचा सत्याग्रह करून इतिहास घडविला.त्याला आता 100 वर्ष पूर्ण होत आहेत. या शताब्दी वर्षात ऐतिहासीक चवदार तळयाचे सुशोभीकरण, जलशुद्धीकरण ; सौदर्यीकरणाचे काम चालु आहे. त्याची पाहणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी चवदारतळे येथे भेट देवुन केली.ना. रामदास आठवले यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास विनम्र अभिवादन केले. ऐतिहासीक क्रांतीभुमी असणा-या चवदार तळयाच्या सुशोभीकरण सौदर्यीकरण कामाची पाहणी त्यांनी केली. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, रायगडचे संपर्क प्रमुख राहुलभाई सोनवले, मुंबई प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ कासारे, अमित मोरे, अमित तांबे, महाड रिपाइंचे तालुका अध्यक्ष मोहन तांबे आदि अनेक मान्यंवर उपस्थित होते.
