रायगडच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक

0
14

रायगडच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक!

रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात प्रस्तावित असलेल्या बल्क ड्रग पार्क प्रकल्पाच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या अडीअडचणी तसेच विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आज मंत्रालयातील दालनात राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

यावेळी राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. भरतशेठ गोगावले यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते.

या बैठकीत प्रकल्पाशी संबंधित विविध विषयांचा सविस्तर आढावा घेत संबंधित अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली. राज्यातील औद्योगिक विकासाला चालना देणे, गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण निर्माण करणे आणि स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे, या दृष्टीने अशा प्रकल्पांना गती मिळणे महत्त्वाचे असल्याचे यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here