रत्नागिरी नगर परिषद प्रभाग क्रमांक १५ मधील रहिवासी डॉ. भक्ती दिलीप घुडे यांनी वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण (MD Anaesthesiology) यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल त्यांचा करण्यात आला सत्कार

0
5

रत्नागिरी नगर परिषद प्रभाग क्रमांक १५ मधील रहिवासी डॉ. भक्ती दिलीप घुडे यांनी वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण (MD Anaesthesiology) यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल त्यांचा करण्यात आला सत्कार—

रत्नागिरी नगरपरिषदेच्या नगरसेविका सौ. वर्षा परशुराम ढेकणे तसेच भारतीय जनता पार्टीचे रत्नागिरी शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या हस्ते डॉ. भक्ती घुडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी त्यांच्या या यशाबद्दल अभिनंदन करून पुढील वैद्यकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्या यशामुळे कुटुंबीयांसह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रसंगी डॉ. भक्ती यांचे वडील दिलीप घुडे आई रश्मी घुडे भाऊ हर्षल घुडे काका मनोज घुडे काकी वैशाली घुडे तसेच माजी नगरसेविका सौ. सत्यवती बोरकर उपाध्यक्ष सचिन गांधी प्रदेश युवामोर्चा उपाध्यक्ष विक्रम जैन उपस्थित होते

डॉ. भक्ती घुडे यांच्या या यशाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here