रत्नागिरीचे सुपुत्र आणि भाजपचे नेते परशुराम उर्फ दादा ढेकणे यांची छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाच्या राज्यस्तरीय समितीवर नियुक्ती—-
महसूल विभागाचा शासन निर्णय जारी; राज्यातील १० अशासकीय सदस्यांची नियुक्ती, रत्नागिरी जिल्ह्याला मिळाले प्रतिनिधित्व–
खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य आणि सरपंच यांच्याशी संपर्क साधून अभियानातील त्यांच्या सहभागाची खात्री करणे तसेच अभियानाच्या यशस्वी अंमल बजावणीसाठी शासनाला सूचना करणे, अशा जबाबदाऱ्या सदस्यांवर सोपविण्यात आल्या आहेत.
👉🏻राज्यस्तरावर नियुक्त १० अशासकीय सदस्यांमध्ये रत्नागिरीचे परशुराम प्रभाकर ढेकणे यांचा समावेश झाल्याने रत्नागिरी जिल्ह्याच्या दृष्टीने ही महत्त्वपूर्ण बाब मानली जात आहे.. दादा ढेकणे यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल भाजप च्या अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या..
अभियान अधिक प्रभावी, लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान करण्यासाठी अशासकीय सदस्य नियुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
शासन निर्णयातील यादीप्रमाणे सदस्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत.
1.) श्री. संजय कडूपा कोंडगे – नांदेड
2)श्री. अरविंद पाटील निलंगेकर – लातूर
3.) श्री. नितीनकुमार सुरेशचंद्र भुतडा – यवतमाळ
4.) श्री. संजय गजानन गाते – वर्धा
5.) श्री. वासुदेव शंकरराव काळे – पुणे जिल्हा
6)श्री. जगदीश तुकाराम मुळीक – पुणे
7)श्री. प्रकाश कृष्णा निकम – पालघ. 8. )श्री. परशुराम प्रभाकर तथा दादा ढेकणे – रत्नागिरी 9. )श्री. भानुदास रतन बेरड – अहिल्यानगर
10) श्री. बबनराव राजवजी चौधरी – धुळे
या सदस्यांवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या
नियुक्त अशासकीय सदस्यांनी अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय समिती सदस्यांशी समन्वय साधणे, राज्य समन्वयकांना अभियानाच्या नियोजन व आयोजनाबाबत वेळोवेळी माहिती देणे, तसेच जिल्ह्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार आवश्यक कार्यवाही करणे अपेक्षित आहे.
तसेच खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य आणि सरपंच यांच्याशी संपर्क साधून अभियानातील त्यांच्या सहभागाची खात्री करणे, अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनाला आवश्यक सूचना करणे आदी जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्याला राज्यस्तरावर प्रतिनिधित्व
या नियुक्तीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील परशुराम प्रभाकर ढेकणे यांना राज्यस्तरीय अभियानात काम करण्याची संधी मिळाली आहे. महसूल विभागाच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमात जिल्ह्याचा आवाज राज्यस्तरावर पोहोचविण्याच्या दृष्टीने या नियुक्तीकडे पाहिले जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाच्या माध्यमातून महसूल विभागाशी संबंधित नागरिकांच्या समस्या सोडविणे आणि शासकीय सेवा अधिक लोकाभिमुख करण्यावर भर देण्यात येणार आहे.
या नियुक्तीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील परशुराम प्रभाकर देकणे यांना राज्यस्तरीय अभियानात काम करण्याची संधी मिळाली आहे.
महसूल विभागाच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमात जिल्ह्याचा आवाज राज्यस्तरावर पोहोचविण्याच्या दृष्टीने या नियुक्तीकडे पाहिले जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाच्या माध्यमातून महसूल विभागाशी संबंधित नागरिकांच्या समस्या सोडविणे आणि शासकीय सेवा अधिक लोकाभिमुख करण्यावर भर देण्यात येणार आहे.
