रत्नागिरी -महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीच्या ट्रक आणि बस विभागाचे कस्टमर केअर सेंटरचा नुकताच हातखंबा-निवळी दरम्यान मुंबई-गोवा महामार्गालगत सत्संग भवन समोर उद्योजक अण्णा सामंत यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. महिंद्राच्या अवजड वाहनांची विक्री व सेवा याठिकाणी पुरवली जाणार आहे. महिंद्राच्या बस व ट्रकचे माऊली अॅटोमोबाईलच्या माध्यमातून वितरण करण्यात आले.
देशविदेशातील अवजड वाहन उद्योगातील प्रख्यात कंपनी महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे माऊली अॅटोमोबाईलच्या रुपात कस्टमर केअर सेंटर सुरु झाले आहे. याचा शुभारंभ महिंद्राचे सेल्स आणि कस्टमर केअर विभागाचे व्हाईस प्रेसिडेंट एम. सतिश, झोनल सर्व्हीस हेड आनंद गोविळकर, पश्चिम विभागाचे झोनल बिझनेस हेड विजय शर्मा यांच्या उपस्थितीत झाले. महिंद्राचे अधिकृत कस्टमर केअर सेंटर झाल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर धावणार्या महिंद्राच्या वाहनधारकांची चिंता मिटली आहे.
याच ठिकाणी विक्री व पश्चात सेवाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. महिद्राच्या बस डिव्हिजन ने नुकताच एक लाख बस विक्रीचा टप्पा पूर्ण केला आहे. यावेळी प्रतिक पडवळ, अभिजित घोडके, तुषार साळवी व महिंद्रा ट्रकचे ग्राहक व हितचिंतक उपस्थित होते. यावेळी माऊली अॅटोमोबाईल्सचे हरिश पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
