रत्नागिरी – दरवर्षी २८ फेबुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो. विज्ञानाच्या फायद्याबद्दल समाजात व विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी व वैज्ञानिक वृती निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी येथील
एम.एस्. नाईक प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांना विज्ञान लॅब सफर घडवून त्यांना तेथील सर्व उपकरणाची माहिती देण्यात आली. तसेच शिक्षकांनी वर्गामध्ये विद्यार्थ्यांना विज्ञान दिवसाचे महत्व समजावून सांगितले. विद्यार्थ्यी वैज्ञानिक उपकरणेअतिश्यउत्सुकतेने हाताळत होते. अतिश्य आनंदी वातावरणात हा दिवस साजरा करण्यातआला.
प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.अश्फाक नाईक व सौ. अरिफा म्हालदार व शिक्षक वर्ग यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते…
