सावर्डे – गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डेत मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र वारे व ज्येष्ठ शिक्षक सुरेंद्र अवघडे यांनी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त विष्णू वामन शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. अनुजा बागवे व नितीन सावंत यांनी विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जीवनपटाची माहिती देणारे सचित्र भित्तिपत्रक तयार केले .त्याचे उद्घाटन एमसीव्हीसीप्रमुख सलीम मोडक यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थी मनोगतामध्ये आर्या महेंद्र चव्हाण, वेदिका सुर्वे यांनी वि. वा. शिरवाडकर यांच्या कार्याची माहिती दिली .तसेच मणिकर्णिका गुढेकर हिने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त गीत गायन केले. शिक्षक मनोगतात महेश गंगावणे यांनी मराठी भाषेची थोरवी, मराठी भाषेचे महत्व,त्याचबरोबर कथेद्वारे मराठी भाषेचा उगम स्पष्ट केला.प्राचार्य राजेंद्र वारे यांनी इसवी सन पूर्व कालखंडामध्ये लोकांची भाषा व इतिहासातील काही उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.ज्योती निकम यांच्या आभार प्रदर्शने कार्यक्रमाची सांगता केली.
