रत्नागिरीबेटी बचाओ, बेटी पढ़ाओ दशपूर्ती सोहळा रॅली' चे आज रत्नागिरीत आयोजन!!

बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ दशपूर्ती सोहळा रॅली’ चे आज रत्नागिरीत आयोजन!!

रत्नागिरी ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ या भारत सरकारच्या उपक्रमाला दि. २२ जानेवारी २०२५ रोजी दहा वर्षे पूर्ण झाली असल्याने रत्नागिरी जिल्हा पोलीस दल व जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज गुरुवार दि. ०६/०३/२०२५ रोजी सायंकाळी ०४.३० ते ०६.०० या वेळेत पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, रत्नागिरी येथे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व महिला व मुलींसाठी ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ दशपूर्ती सोहळा व रॅली’ चे आयोजन करण्यात आलेले आहे.*

विशेष पोलीस महानिरीक्षक, कोंकण परिक्षेत्र संजय दराडे, यांच्या शुभ हस्ते या दशपूर्ती रॅलीला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात येणार आहे. या प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक, धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक, श्रीमती. जयश्री गायकवाड, पोलीस अधिकारी व अंमलदार, जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय रत्नागिरी येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित असणार आहेत.

या दुचाकी रॅली करिता खालील प्रमाणे मार्ग (Route)असणार आहे.

रॅलीची सुरुवात : पोलीस मुख्यालय कवायत मैदान -> जेल नाका -> माळ नाका – > जेल नाका -> भाटये बीच -> जयस्तंभ -> रहाट घर -> नाईक फॅक्टरी -> पेठ किल्ला व परत -> पोलीस कवायत मैदान येथे शेवट होणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी व मुलींनी या दशपूर्ती रॅली मध्ये सहभाग घ्यावा. असे आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे.

Breaking News