रत्नागिरीभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना-ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 15 मार्चपर्यंत मुदतवाढ

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना-ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 15 मार्चपर्यंत मुदतवाढ

रत्नागिरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 15 मार्च 2025 पर्यंत वाढविण्यात आल्याचे सहआयुक्त (शिक्षण ) प्रमोद जाधव यांनी कळविले आहे.
अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 15 मार्च 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे. तरी विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
तसेच यापूर्वी स्वाधार योजनेचा अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांसाठी बँक तपशिल भरण्या बाबतचा टॅब उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्याअनुषंगाने सर्व विद्यार्थ्यांचे बँक तपशिल भरुन घेण्याच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करावी, असेही कळविण्यात आले आहे.

Breaking News