रत्नागिरीठाकरे शिवसेनेतर्फे होणार विविध क्षेत्रांतील महिलांचा सन्मान--

ठाकरे शिवसेनेतर्फे होणार विविध क्षेत्रांतील महिलांचा सन्मान–

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य : स्वर्गीय मीनाताई ठाकरे सन्मान पुरस्काराचे वितरण-

रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीतर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात यशस्वीरित्या कार्यरत असलेल्या महिलांना स्वर्गीय मीनाताई ठाकरे सन्मान पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. हा कार्यक्रम ८ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता शहरातील साळवी स्टॉप येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात होणार आहे.

आज महिलांनी घराचा उंबरठा ओलांडत वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वीपणे काम करत आहेत. आजच्या काळात महिला कार्यरत नाही असे एकही क्षेत्र नाही. त्यांच्या याच कार्याची दखल घेत आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून रत्नागिरीतील क्रीडा, पत्रकारिता, सामाजिक, शैक्षणिक, कला, वैद्यकीय, ऑटोमोबाईल आदी विविध क्षेत्रांत कार्यरत राहून आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविणाऱ्या महिलांच्या कार्याचा गौरव स्वर्गीय मीनाताई ठाकरे सन्मान पुरस्कार देऊन केला जाणार आहे. शाल, सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप असेल.

या कार्यक्रमात रत्नागिरीतील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. तोरल शिंदे या महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करणार असून, रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या महिला दक्षता समितीच्या गायत्री पाटील या आताच्या काळात महिलांनी कसे सजग राहिले पाहिजे याविषयी जनजागृती करणार आहेत.

या कार्यक्रमाला रत्नागिरीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.

Breaking News