संगमेश्वरधामणी सिएनजी पंपाच्या व्होल्टेज प्रॉब्लेम ने त्रस्त रिक्षा व्यवसाईकांची महावितरण ऑफिस ला...

धामणी सिएनजी पंपाच्या व्होल्टेज प्रॉब्लेम ने त्रस्त रिक्षा व्यवसाईकांची महावितरण ऑफिस ला धडक.आठ दिवसात वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन.

संगमेश्वर /एजाज पटेल

संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथील सिएनजी पंपामध्ये गेले वर्षभर कमी व्होल्टेज मुळे गॅस पुरवठा सुरळीत होत नसल्याने येथील रिक्षाव्यवसाईक चांगलेच त्रस्त झाले होते . आज अखेर रिक्षा मालक चालक संघटना कडवई तुरळ चिखली चे अध्यक्ष मिलिंद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील रिक्षा व्यवसाईकांनी महावितरण कम्पनी च्या संगमेश्वर कार्यालयावर आपला मोर्चा वळवला. यावेळी प्रभारी उपकार्यकारी अभियंता फारूक गवंडी यांनी चर्चेअंती आठ दिवसात योग्य त्या उपाययोजना करून वीजपुरवठा सुरळीत चालू करण्याचे आश्वासन दिले .
धामणी येथील सिएनजी पंपावर गेले वर्षभर सकाळी आठ ते दुपारी बारा यावेळेत व्होल्टेज कमी असल्याने सिएनजी चा कॉम्प्रेसर लोड घेत नसल्याने सिएनजी पुरवठा बंद रहात होता. त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत होता . ऐन सिझन च्या वेळी हातावर पोट असणाऱ्या रिक्षाव्यवसाईकाना तासनतास लाइन मध्ये उभे रहावे लागत असल्याने व्यवसायाचे नुकसान होत होते .
धामणी सिएनजी पंपाच्या व्यवस्थापनाकडून गेले वर्षभर याबाबत महावितरण कँपनिच्या संगमेश्वर कार्यालयाकडे पत्रव्यवहार करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते .आज अखेर या त्रासाला कंटाळलेल्या कडवई , तुरळ,चिखली ,माखजन, आरवली, कुंभारखाणी येथिल रिक्षा संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मिलिंद चव्हाण यांच्या नेतृवाखाली महावितरण कम्पनिच्या संगमेश्वर कार्यालयावर धडक दिली.
यावेळी प्रभारी उप कार्यकारी अभियंता फारूख गवंडी यांच्याशी चर्चा करण्यात आली .गवंडी यांनी महावितरण च्या समस्या मांडल्या . तसेच यासाठी महानगर गॅस कँपनिच्या कॉम्प्रेसर चे सेटिंग कमी करून त्यांनी ही आपल्याला सहकार्य करावे महावितरण कम्पनीच्या ज्या त्रुटी असतील त्या येत्या आठ दिवसात वीजपुरवठा सुरळीत केला जाईल असे आश्वासन गवंडी यांनी दिल्याने रिक्षा व्यवसाईकांनी समाधान व्यक्त करत आभार मानले .उपकार्यकारी अभियंता याना निवेदन देण्यात आले . यावेळी प्रतीक सुर्वे,राजेंद्र यादव,सचिन हेमन,प्रकाश खाडे,सुनील गागरकर ,दिनेश गुरव,सुनील गुरव आदी रिक्षा संघटनेचे पदाधिकारी पत्रकार एजाज पटेल ,दीपक भोसले उपस्थित होते.
फोटो- उपकार्यकारी अभियंता गवंडी याना निवेदन देताना रिक्षा संघटनेचे पदाधिकारी.

Breaking News