राजकीयशिवसेनेची मुंबई उपनगर संवाद बैठक मंत्री ना. उदय सामंत ह्यांच्या उपस्थितीत उत्साहात...

शिवसेनेची मुंबई उपनगर संवाद बैठक मंत्री ना. उदय सामंत ह्यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न

शिवसेनेची मुंबई उपनगर संवाद बैठक वांद्रे येथे राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि शिवसेनेचे मुंबई उपनगर संपर्कमंत्री ना. उदय सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी भविष्यात होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने विचारमंथन करण्यात आले.

शिवसेना प्रमुख आणि उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी संघटनात्मक पातळीवर सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन यावेळी ना. उदय सामंत ह्यांनी केले. तसेच, मुंबई उपनगर संपर्कमंत्री म्हणून प्रत्येक विभागात जाऊन नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तातडीने बैठका घेण्याचे नियोजन करण्याची ग्वाही ना. उदय सामंत ह्यांनी दिली.

शिवसेनेचा विचार घराघरात व मनामनात रुजवण्यासाठी प्रयत्नशील–

शिवसेनेचा विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माझ्यावतीने सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील आणि त्यासाठी सर्व शिवसैनिकांनी एकत्र येऊन ताकदीनिशी साथ द्यावी, असे आवाहन यावेळी . ना. उदय सामंत ह्यांनी केले.

विकासाच्या दिशेने सखोल चर्चा आणि मार्गदर्शन-

मुंबई उपनगरातील विविध प्रश्नांवर सखोल चर्चा झाली. यावेळी उपनगराच्या विकासासाठी सकारात्मक विचार मांडले गेले व भविष्यातील दिशादर्शक धोरणांवर मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले. शिवसैनिकांच्या एकजुटीने आणि समर्थ नेतृत्वाखाली मुंबई उपनगरातील शिवसेना भविष्यात अधिक बळकट होईल, असा आत्मविश्वास यावेळी. ना. उदय सामंत ह्यांनी व्यक्त केला.

या बैठकीला मुंबई उपनगरातील शिवसेना आमदार श्री. तुकाराम काते, श्री. दिलीप मामा लांडे, श्री. मुरजी पटेल, श्री. प्रकाश सुर्वे आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते श्री. शिशिर शिंदे विभाग प्रमुख कुणाल सरमरकर यांच्यासह उपनेते, नगरसेवक, , शाखाप्रमुख व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

Breaking News