प्रमोद महाजन क्रिडा संकुल, रत्नागिरी येथे आयोजित जय भैरी मुरुडवाडा क्रिकेट क्लबच्या चॅम्पियन ट्रॉफी २०२५ स्पर्धेस राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख बाबू म्हाप, युवासेना कोकण विस्तारक परशुराम कदम, तसेच शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या भव्य स्पर्धेसाठी खेळाडू आणि क्रिकेटप्रेमींची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. खेळाडूंमधील उत्साह, स्पर्धेतील चुरस, आणि प्रेक्षकांचा जल्लोष पाहून खरोखरच आनंद झाला.
क्रिकेट हा केवळ खेळ नसून, तरुणाईला एकत्र आणणारा आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा उत्सव आहे, असे यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हणत या स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
