रत्नागिरीना. उदय सामंत ह्यांच्या हस्ते करबुडे गावातील विविध विकासकामांचे लोकार्पण

ना. उदय सामंत ह्यांच्या हस्ते करबुडे गावातील विविध विकासकामांचे लोकार्पण

करबुडे गावात 10 कोटी रुपयांच्या विविध लोकहिताच्या विकासकामांचे लोकार्पण राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या हस्ते करण्यात आले. मतदारसंघातील प्रत्येक गावात विकासाची गंगा पोहोचवण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे. शेवटच्या घटकापर्यंत विकासाची कामे पोहोचल्याशिवाय मतदारसंघाचा खरा विकास होणार नाही, याची मला खात्री आहे आणि त्यासाठी सातत्याने काम करीत आहे, असे यावेळी मा. ना. उदयजी सामंत म्हणाले.

गेली २५ वर्षे मतदारसंघातील जनतेने मला मतदानरूपी प्रेम व पाठिंबा दिला आहे. या जनतेच्या विश्वासाला कायम जागून, भविष्यातही त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी दिली.

कार्यक्रमाला तालुका प्रमुख बाबू म्हाप, उप तालुका प्रमुख शंकर सोनवलकर, युवा सेना कोकण विस्तारक परशुराम कदम, विभाग प्रमुख प्रवीण पांचाळ, गावातील सरपंच संस्कृती पाचकुडे, ग्रामपंचायत सदस्य व गावातील विविध पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Breaking News