राजकीयशिवसेना उबाठा गटाचे माजी संगमेश्वर पंचायत समिती सभापती व लांजा राजापूर साखरपा...

शिवसेना उबाठा गटाचे माजी संगमेश्वर पंचायत समिती सभापती व लांजा राजापूर साखरपा विधानसभा क्षेत्रप्रमुख जयसिंग( जया)माने यांचा राजीनामा

शिवसेना उबाठा गटाचे माजी संगमेश्वर पंचायत समिती सभापती व लांजा राजापूर साखरपा विधानसभा क्षेत्रप्रमुख जयसिंग( जया)माने यांचा राजीनामा . लवकरच करणार शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश

मागील 30 वर्षे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात सक्रिय असणाऱ्या व सध्या लांजा राजापूर साखरपा विधानसभा क्षेत्रप्रमुख म्हणून काम पाहणाऱ्या जयसिंग(जया) माने यांनी आपल्या पदाचा व प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा शिवसेना सचिव माजी खासदार विनायक राऊत यांच्याकडे वैयक्तिक कारणातून राजीनामा पाठविला आहे.
मागील 30 वर्षे आपण पक्षासाठी अखंड वेळ देत सक्रिय राजकारण केले होते. 1994 साली विद्यार्थी दशेत असताना शाखाप्रमुख पदापासून आपल्या कार्याला प्रारंभ केला. त्यानंतर पक्षबांधणी आणि पक्षवाढीसाठी मेहनत घेतली होती. त्याचबरोबर सर्व पक्षीयांमध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचे संघटन कौशल्य असणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. संगमेश्वर पंचायत समिती सभापती असताना त्यांनी केलेली कामगिरी सुद्धा उल्लेखनीय होती.
राजीनामा दिल्यामुळे आणि पक्षातून बाहेर पडत असल्याने व त्यांच्या निर्णयाने खळबळ उडाली आहे.तसेच भविष्यात जया माने काय निर्णय घेतात याबाबत विविध चर्चा सुरु आहेत.

Breaking News