ऍग्री स्टॅग कॅम्प, महा आरोग्य तपासणी शिबिरे, कार्यालयीन स्वच्छता कार्यक्रम, नवनियुक्त ग्राम महसूल अधिकारी यांचे प्रशिक्षण, राजापूर तालुक्यातील विविध भागातील क्षेत्रीय कार्यालयांना भेटी आदी उपक्रम राबवण्यात आले
क्षेत्रीय कार्यालयासाठी १०० दिवस कृती आराखड्याच्या अंतर्गत राजापूर प्रांत कार्यालयाच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये तहसील कार्यालय लांजा यांच्यावतीने विविध शासकीय दाखले वितरण करण्यात आले. प्रांत कार्यालयाच्या अंतर्गत प्रत्येक मंडळात ऍग्री स्टॅग कॅम्प राबवण्यात आला. राजापूर ग्रामीण रुग्णालय येथे महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. राजापूर तहसील कार्यालयात देखील आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उप विभागीय अधिकारी कार्यालय तथा प्रांत कार्यालय राजापूर येथे कार्यालयीन स्वच्छता कार्यक्रम या उपक्रमा अंतर्गत २ अधिकारी आणि १८ कर्मचारी यांनी ४५ किलो कचरा जमा करून तो नष्ट करण्यात आला. त्याचप्रमाणे कार्यालयाच्या आजुबाजूच्या परिसरात देखील स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना अभ्यागत कक्षामध्ये पंख्याची सोय करण्यात आली आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. अर्ज लिहिण्यासाठी टेबल तसेच स्वच्छ प्रसाधनगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. १०० दिवसांच्या कृती आराखड्याच्या अनुषंगाने अभ्यागतांसाठी बैठक व्यवस्था तसेच वाचनासाठी पुस्तके अभ्यागत कक्षामध्ये ठेवण्यात आली आहेत. तसेच अभ्यागतांना अधिकाऱ्यांना भेटण्याची वेळ निश्चित करून देण्यात आली आहे. तसेच तक्रार नोंद वहीची सुद्धा सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. नवनियुक्त ग्राम महसूल अधिकारी यांचे द मार्च रोजी प्रांत कार्यालयात प्रशिक्षण घेण्यात आले. दर बुधवारी आणि शुक्रवारी राजापूर तालुक्यातील विविध भागातील क्षेत्रीय कार्यालयांना भेटी देण्यात आल्या. राजापूर उप विभागीय अधिकारी तथा प्रांत अधिकारी डॉ. जास्मिन यांनी तालुक्यातील नाटे जेटीच्या कामाच्या ठिकाणी भेट दिली. रायपाटण येथे आरोग्य उपकेंद्र, समाज कल्याण मुलांचे वसतिगृह, प्रस्तावित क्रीडा संकुल या ठिकाणी भेटी दिल्या. पितांबरी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी वजन काटा पाहणी केली. हातिवले येथील चिरेखांनीना भेटी दिल्या. राजापूर पडवे मिरगुलेवाडी येथे प्राँझ प्रकल्पांच्या तपासणीसाठी प्रांताधिकारी उपस्थित राहिल्या. पडवे, साखरकोंबे, होळी, जैतापूर, जानशी या भागातील आपले सरकार सेवा केंद्र (सी एस सी) केंद्रांना भेटी देऊन त्यांची तपासणी करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. राजापूर तहसील मंडळ स्तरावर राजापूर तहसील कार्यालयाला भेट, अव्वल कारकून दफ्तर तपासणी, रास्त भाव धान्य दुकान तपासणी, पेट्रोल पंप तपासणी आणि सी एस सी केंद्र यांची तपासणी करण्यात आली.