त्रिशा हिच्यावर सर्वस्तरातून होतोय कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव
संगमेश्वर /एजाज पटेल
युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ सांगवे आयोजित सिंधुरत्न टॅलेंट परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला असून संगमेश्वर तालुक्यातील डावखोल येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळेने यश संपादन केले असून या शाळेत सातवीत शिक्षण घेणारी कु. त्रिशा पल्लवी सागर देसाई हि सिल्वर मेडलची मानकरी ठरली आहे.
महाराष्ट्रातील अंत्यत मानाच्या सिंधुरत्न टॅलेंट सर्च (STS) सन 20024/25 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत सहभागी कोंडये गावचे ग्रामपंचायत चे माजी सदस्य तसेच प्रतिष्टीत सामाजिक कार्यकर्ते सागर सुरेश देसाई यांची कन्या त्रिशा हिने 200 पैकी 134 गुण स्वतःच्या पदरात पाडून रौप्य पदक पटकवून ग्रामीण भागात असलेल्या डावखोल शाळेचे नाव उंच शिखरावर पोववण्याची स्तुत्य अशी कामगिरी केली आहे.
उचशिक्षित असलेले त्रिशा चे वडील सागर देसाई उच्चाशिक्षित आई पल्लवी तसेच शाळेचे शिक्षक आंनद मोरे, जयश्री भोजने, अलका ताई, मुख्याध्यापक प्रशांत जाधव या गुरुजणांच्या लाभलेल्या मार्गदर्शना मुळे मला मला घावघवीत असे यश मिळवता आले असल्याचे कु. त्रिशा हिने सांगितले.
कोंडये गावचे प्रथम नागरिक महेश देसाई, माजी सरपंच पूनम देसाई, माजी सरपंच सुरेश दसम, ग्रामपंचायत सदस्य दीपक शिंदे, माजी पोलीस पाटील चंद्रकांत उर्फ बावा देसाई आदींनी त्रिशा हिचे कौतुक केले असून रौप्य पदक मिळवून स्वतः बरोबर शाळेचे नाव उच्च शिखरावर पोहचवणाऱ्या त्रिशा चे सर्वस्तरातूनही कौतुक करून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.